आज २६/११...
या तारखेच्या पाठी साल कुठलंही असू दे; आम्हां भारतीयांना, विशेषतः मुंबईकरांना ते २६/११/२००८च वाटतं.
मग आम्ही फार हळहळतो. कारण याच दिवशी 'कुबेर' नावाच्या बोटीतून ११जण आले आणि त्यांनी कुबेराच्या 'या' नगरी वरच हल्ला केला. त्यात देशी नागरिकांना आणि परदेशी पर्यटकांना वेठीस धरले. मग आमच्या शूर जवानांनी [जवान म्हणजे तारुण्याने, जोशाने, उत्साहाने रसरसलेला तेव्हा यात आमचे पोलीसमित्र सुद्धा आले बरं का] अपुर्या शस्त्रसामग्रीच्या बळावर झुंजवले, शेवटपर्यंत झुंजवले, स्वतःच्या आणि त्यांच्याही! इतकंच नव्हे, तर आत्मघातकी आतंकवाद्यांना मिठी मारणे म्हणजे जणू मूर्तिमंत मरणालाच मिठी मारण्याचा प्रकार पण आमच्या शुरांनी ते हि केला आणि आत्मघातकी 'कसब'(कसाई) जिवंत पकडला गेला.
व्वा, काय पराक्रम गाजवतला त्यांन.
...
...
...
मान्य, सर्वच मान्य; पण ....
आज त्या घटनेला ७ वर्षं पूर्ण झालेली असतानाच तत्कालीन अनेक अनुत्तरीत प्रश्न आज हि अनुत्तरीतच आहेत दुर्दैवाने. म्हणूनच त्यांची उत्तरे शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
१] २६/११ मध्ये अपुर्या शास्त्रासामाग्रीमुळे पोलीस हतबल ठरले मग आज पोलीस त्या प्रश्नांतून सुटलेत का ?
- तर नाही; उलट अजूनही पोलीस संशयाच्या धुक्यातच अडकलेत.[नाही, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे नाही तर त्यांच्यावर सतत येणाऱ्या विविध प्रकारच्या बंधनामुळे]आजही 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणणाऱ्या राकेश मारिया सारख्या अधिकाऱ्यांची बदली होतेच.
२] २६/११ नंतर आता तरी सर्वसामान्य सुरक्षित आहेत का ?
- तर नाही, उलट अधिकच असुरक्षित आहेत. कधीतरी कुठुनतरी whatsapp वर अमुक तमुक एरियातबॉम्ब असल्याची खबर येते आणी सर्वसामान्य धास्तावतात.
पण फक्त ती अफवा विरे पर्यंतच !
मग मात्र पुन्हा आंधळ्यासारखे किंवा मग एखाद्या यंत्रासारखे नित्याच्या राहत्गादाग्याला जुंपून घेतात स्वतःला. पण परत कधीतरी टी अफवा येतेच.
म्हणून च विचारावसं वाटतं कि
३] 'Spirit is OK but what about ALERTNESS?'
असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत !
त्यांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हाच 'अच्छे दिन आले' असं म्हणता येईल.पण सगळ्यात महत्वाचा अनुत्तरीत प्रश्न म्हणजे
४] २६/११ च का ? अर्थात त्या आतंकवाद्यांनी २६/११ हीच तारीख का निवडली ?
- उत्तर खरं तर फारच सोप्पं आहे, २६/११ म्हणजे 'भारतीय संविधान दिन' !
पण  २६/११ चे भरमसाठ मेसेजेस WHATSAPP facebook वर फिरत असताना त्यात एकेठी या कारणाचा साधा उल्लेख हि दिसत नाही.
कसा दिसणार म्हणा जिथे रोज आपण आपल्या 'चिरीमिरी' आयुष्यात 'अविनय कायदेभंग चळवळ' र्फाबावत असतोच, तेव्हा  'या'  दिवसाचा मुहूर्त साधून ते आले असावेत याचा पुसटसा अंदाज सुद्धा आम्हांला कसा येईल?
हद्द आहे आमच्या कोडगेपणाची !
आता तर आमच्या या निर्लज्जपणाची सजाच सरकारने नेमक्या याच दिवसाचा मुहूर्त गाठून भारत-पाक क्रिकेट सामने घोष्ट करून
पण तरीही एक आशावाद आहेच कि एक ना एक दिवस आम्ही, भारताचे लोक  एकत्र येऊन ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधू आणि 'अच्छे दिन' खेचून आणु!  
-श्री सर्वेश्वर जोशी©
२६/११/२०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा