बातमी नागराज मंजुळे यांची आणि माझी भूमिका
मुळात नागराज मंजुळे हा एक दिग्दर्शक आहे. समाजातल्या अनिष्ट रूढींवर प्रहार करणारा आहे.
म्हणून त्याला वैयक्तिक आयुष्य नसावं ??
आता तुम्हाला माझी कालची पोस्ट आठवली असेल.
पण हे असं होण्यामध्ये प्रसारमाध्यमांतील वाढती स्पर्धा आणि वाचक/प्रेक्षक टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आजचे पत्रकार कुठल्याही मार्गाचा अवलंब करायला तयार असतात. त्यातलाच एक म्हणजे झगमगाटातल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या अंगावर शिंतोडे उडवणे. आणि हाच प्रकार काल नागराज मंजुळे यांच्याबाबतीत घडला.
मुळात हि प्रसारमाध्यमे वाचक/प्रेक्षकांच्या डोळ्यांवर अंधविश्वासाचा चष्मा लावण्यात यशस्वी झाली आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये आलंय म्हणजे खरंच असणार हे कुठल्याही प्रकारचा सारासार विचार न करता ठरवून आपण मोकळे होतो. आणि ह्यामुळे प्रसारमाध्यमांतून उगवलेल्या नव्या रोपाचं पिक सोशलमिडिया वर सर्वत्र येतं. हेच काल पुन्हा एकदा ह्या प्रकारामुळे अनुभवास आलं.
आता मुळात मला ह्या प्रकाराबाबत काय वाटतं ??
मुळात काडीमोड किंवा डिव्होर्स हि काही साधीसुधी गोष्ट नाही, कि मनात आलं आणि लगेच प्रत्यक्षात आणलं.
तर हि एक सनदशीर/कायदेशीर प्रक्रिया आहे, जी घडून येण्यासाठी दोन्ही बाजूंनी संमती अनिवार्य असते.
जर नागराज मंजुळे यांच्या पत्नीस डिव्होर्स मान्य नव्हता तर तो झालाच कसा ??
ह्याचा अर्थ जेव्हा डिव्होर्स झाला तेव्हा त्यांची संमती होती.
त्यामुळे दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी सुनिता लष्करे-मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचं वैवाहिक नातं भारतीय राज्यघटनेनुसार संपुष्टात आलं आहे आणि त्या वेळी सुनीता लष्करे यांना सनदशीर मार्गाने मिळणारी ७००००० ची पोटगीसुद्धा देण्यात आलेली आहे.
मग दोघेही सनदशीर मार्गाने स्वतंत्र झाले असताना आता परत हि तक्रार करण्याची गरज काय ??
तर नागराज मंजुळे यांना आता मिळालेलं यश !!!
त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा ह्यासाठी करत नसल्याचं सुनिता लष्करे जरी म्हणत असल्या तरीही हे ह्यासाठीच करण्यात येत आहे हे शहाण्यांना लगेच समजेल.
आणि राहिला प्रश्न नागराज मंजुळे यांची गर्लफ्रेंड(??) गार्गी कुलकर्णी हिचा !!
तो सर्वस्वी नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तेव्हा उगाच प्रसारमाध्यमे हाईप करत असलेल्या बातम्यांकडे लक्ष देण्यापेक्षा इतर अनेक महत्वाच्या घडामोडी आजूबाजूला घडत आहेत.
- समीक्षक सर्वेश्वर
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा