सोमवार, ४ जुलै, २०१६
सहवास
“आम्ही दोघंही ‘सहवास’ मध्ये आलो तेच मुळात कुणाचाच सहवास नसल्याने, सहवासाच्या ओढीने !
“ तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो, प्लीज
आम्हा दोघांनाही एका रूममध्ये राहायला मिळावं. मुळात माझ्या स्पष्टवक्तेपणाने इतर
पुरुष  सभासद माझ्या सोबत राहायला तयार
नाहीत. आणि त्याचजोडीला मला संसाराचा गाडा ओढताना ‘माझ्या वर्षा’सोबत करायच्या
राहिलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील. ” वसंतराव घडाघडा नेहमीप्रमाणेच मनातलं सारं
स्पष्टपणे बोलून गेले आणि नंतर वर्षाताईंकडे पाहू लागले.
“ मुळात मला संस्थेच्या नियमांप्रमाणे असं करता
येणार नाही, पण त्याचबरोबर एक पर्यायसुद्धा सांगतो, तुमच्या दोघांच्या फॅमीलीजना
काहीही हरकत नसेल तर तुम्ही दोघांपैकी एकाच्या मूळ घरी एकमेकांसोबत राहू शकता”
खरंतर मलाच ‘नाही’ म्हणताना वाईट वाटत होतं पण पर्याय ऐकल्यावर दोघांच्याहि
चेहऱ्यावर हसू  फुललं. कारण वसंतरावांच्या
मुलाला भारतात यायचंच नव्हतं त्यामुळे त्यांच्याघरी दोघंही राहू शकत होते.
त्या संध्याकाळी वसंतराव वर्षाताईंसाठी
मोगर्याचा गजरा घेऊन आले होते, वर्षाताईंनी वसंतरावांकडून तो हौसेनं माळून घेतला
आणि त्यानंतरमात्र दोघेही अश्रूंमध्ये चिंब भिजले.
दुसर्या दिवशी सकाळीच दोघेही ‘निरोप’ घ्यायला केबिनमध्ये आले. दोघांच्याही चेहऱ्यावर पूर्वीप्रमाणे पुर्णत्वाचं समाधान होतंच, पण आता ‘ती’ पूर्वीची हुरहूर जाऊन एक गोड हास्य उमललं होतं. त्या दोघांनी जणू ‘सेकंड इनिंग’ला सुरुवात केली होती.
भारद्वाज आणि संजय : एक प्रेमकथा
"का रे भारद्वाजा ?;
एरवी गवतात लपून छपून मला निरखत असतोस, तुझी मान तर सारखी टुकू-टुकू हलत असतेस मग आज सकाळीच त्या झाडावर असा शांत का बसलायस ??
लहानपणापासून तुझी कुकडूक ऐकत आले, लहानपणी तुझ्या आवाजाला मी प्रत्युत्तर द्यायचे, मग शिवाशिवीचा खेळ चालायचा आपला !
मग हळूहळू मोठी होत गेले, कॉलेजला गेले तसतसा तो वेडेपणा वाटायला लागला कारण नवीन क्षितिजे खुणावू लागली होती.
मग शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली आणि मी घरी आले, घरी आल्या आल्या संजू, राजू, मिनू, निनु माझ्याभोवती नाचू लागले आणि नाचता नाचता गाऊ लागले, "ताईचं लग्न, ताईचं लग्न"
अप्पा खुश होऊन सांगत होते, "बाळा नाव काढलंस" खरंतर लहान असल्यापासून 'नकुशी' झालेले मी, आज काय असं घडलं ?, तर पुण्यातल्या रावसाहेब देशपांड्यांनी स्वतः घरी येऊन त्यांचा एकुलता एक मुलगा, संजयसाठी मला मागणी घातली होती.
रावसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ! लक्ष्मी आणि सरस्वती ज्यांच्या घरी पाणी भरते असं लहान असल्यापासून ऐकलं होतं, त्या रावसाहेबांनी आपल्या 'नकुशी'ला मागणी घालणं हा अप्पांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.
पुण्यात मोठ्ठा वाडा, भोसरीमध्ये लांब-रुंद शेतजमीन, नोकर-चाकर, असं घरचं सारं तर ठीक होतच पण उंच, अंगापिंडाने मजबूत, देखणा, गोरा-गोमटा, पिळदार मिश्या असलेले संजय, लग्नाला माझा विरोध असण्याची काहीच गरज नव्हती. अर्थात मी संजयना लग्नापूर्वी फक्त फोटोत पाहिलं होतं.
 
नाही म्हणायला मागणी येण्यापूर्वी, मी पुण्यात आत्याकडे राहत असताना आत्येभावाच्या मित्रांबरोबर संजयहि आले होते आणि ते गप्पांमध्ये कमी मला पाहण्यातच जास्त रंगले होते, आणि ते आत्येभावाच्या इतकं लक्षात आलं कि तो त्यानंतर मला 'श्रीमती संजय'च म्हणू लागला.
होता-होता लग्न झालं, एक महिना सुखात आणि सुखस्वप्नं रंगवण्यात गेला आणि सैन्यात कॅप्टन असलेल्या संजयना सीमेवर रुजू होण्याचा आदेश आला.
संजय गेले आणि पुन्हा एकदा पदरी उपेक्षा-अवहेलना-टोमणे-दुःख यांची ढग आली. कारण तेव्हा गेलेले संजय आजही परतले नाहीत. सुरुवातीला आमचं प्रेम पत्रातून वाढत होतं, पण काही दिवसांनी सारंच संपलं.
त्यांचाच बटालियन मध्ये असणाऱ्या आतेभावाच्या सांगण्यानुसार ते कदाचित पाक सैन्याकडे कैदेत असतील. तर केंद्र शासनाने त्या युद्धातल्या मृतांच्या यादी त्यांचे नाव घातले.
कुणी कै तर कुणी कै सांगत राहिले, घरी सगळेच संजयच्या शोकात बुडाले.
पण मी आज पर्यंत कधीच संजयसाठी रडले नाही, आजहि सधवेसारखीच राहते, कारण मला माहितीय आजही माझे संजय जिवंत आहेत आणि ते कधीनकधी परतुन नक्की येतील.
पण सासरच्या साऱ्यांनी मात्र तेव्हाच संजय 'मृत' झाले हे गृहीत धरलं, मी त्यांच्या घरात 'काळ्या पायांनी' आले होते ना; शेजार-पाजाऱ्यांनी, नातलगांनी 'वांझ' ठरवले होते.
संजय ज्यांच्यासाठी सीमेवर गेला होता, तो ज्यांच्यासाठी हरवला आहे, त्यांपैकी काही जणांनीच संजयच्या 'प्रिय संज्योतिस' वांझ, काळ्या पायाची ठरवली होती, हे जर त्यांना समजलं असतं तर संजयनी लगेच माझ्याकडे धाव घेतली असती. पण त्यांना कळवण्याचा काहीच मार्ग नव्हता.
म्हणून आजपर्यंत त्यांची वाट पाहते आहे.
खात्री आहे एक दिवस संजय नक्कीच परततील.
आणि आज तू असा शांत बसून कसले संकेत देत आहेस ?
येतील का रे संजय परत ?
अरे, त्या टॅक्सीतुन ते कोण उतरते आहे ? उंच, बळकट देहयष्टी, गोरा वर्ण, पिळदार मिश्या, सैनिकी पोशाख ! अरे 'हे' नक्कीच संजय आहेत कि मला पुन्हा एकदा भास होतोय ?
अरे हे काय, संजयच आहेत हे नक्की, अच्छा तर लब्बाडा ह्यासाठी शांत बसला होतास होय, आता तुही ओरड आणि तुझ्यासोबत मी ओरडणार 'कुक्कुड कुक'"©
काल्पनिक प्रवासवर्णन
मी ना धड आस्तिक-ना धड
नास्तिक होतो तेव्हा नर्मदामैय्याने माझ्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनाची हि कथा
!!
हि गोष्ट आहे ती मी बारावी
झाल्यानंतरची, वयाचं १६वं वर्षं ओलांडून १७व्या वर्षात पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे
अंगात तारुण्याचं सळसळतं वारं भरलं होतं. जगाच्या विरोधात जाऊन जग जिंकण्याची
खुमखुमी चढली होती. मुळातच बाबांचं लग्न उशिरा झालं होतं आणि त्यातही लग्नानंतर
गर्भार होण्यासाठी आईला अधिक कालावधी लागला होता, त्यामुळे बाबांमध्ये आणि
माझ्यामध्ये जनरेशन गॅपची भिंत उभी राहिलेली. आणि त्यात लागलेली संगत, परिणामी
व्यसनांच्या आहारी गेलो होतो, त्यामुळे घरी रोजच भांडणं व्हायची. त्यात बारावीत आकर्षणाला
प्रेम समजून वाहवत गेलो. या सार्याचा परिणाम बारावीच्या निकालात दिसलेला.  आता करायचं काय ? घरी कसं जायचं ? बाप मारेल काय
? घरातून बाहेर काढेल काय ? नुसतं थैमान घातलं होतं विचारांनी. अनेकदा डोक्यात आत्महत्येचे विचारही येऊन गेले होते. रात्री ७
वाजेपर्यंत मी कॉलेजमध्येच बसून होतो.  
त्यात एका मित्राने सुचवलं,
“अरे एवढं कसलं टेन्शन घेतोस ? सरळ २-४ दिवस घरातून गायब हो, घरचे इमोशनली फुल
बनतील आणि काहीही बोलणार नाहीत.”
घरी जायचं कुठे वगैरे विचार
करायला वेळच नव्हता. तसाच गेलो दादर स्टेशनला; अहमदाबादच्या मित्राकडे जायचं असं
ठरवून चढलो तो नेमका पंजाब मेल मध्ये a/c बोगीत. 
खरंतर तिकीट वगैरे काहीच नव्हतं.
तेवढ्यात एक धिप्पाड,
जाडजूड, काळ्या वर्णाचा आजोबांच्या वयाचा माणूस माझाकडे आला आणि मला म्हणाला,
“बेटा कहाँ जा
रहे हो ?”
“अ...अं..” त्याला बघुनच एवढा घाबरलो होतो की
अहमदाबाद हे नावच तोंडून निघेना.
“अच्छा, तो तुमभी ओंकारेश्वर जा रहे हो, तो चलो
फिर साथ चलते हैं; तेरा सिट नंबर क्या है बेटा ?”
मी विचार केला की नाहीतरी फक्त घरापासून २-४ दिवस
दूर राहण्यासाठी जायचय मग अहमदाबाद असो किंवा ओंकारेश्वर मला काय फरक पडतो ?  
“अंकल मेरेपास तो टिकट ही नही है” इति मी ! 
“चलो कोई दिक्कत नहीं. यह तो अच्छा ही है,
क्यूंकि मेरे पास एक जादा है”
टीसी आला, त्या बाबाने तिकिट दाखवल, टीसी निघून
गेला.
रात्रि म्हातारबाबाने आणलेला कुसली नावाचा करंजीसारखा दिसणारा फार चविष्ट आणि गोड पदार्थ खाल्ला, जणू काही हा मला गोड
आवडतं म्हणूनच घेऊन आला होता.   ते खाऊन झोपलो ते म्हातारबाबाने
पहाटे ४.३० ला उठवलं, “बेटा, जाग जाओ, अभी खांडवा मे उतरना पडेगा. तभी तो
ओंकारेश्वर जा पाओगे”
या त्याच्या शेवटच्या
शब्दांत इतका विश्वास होता कि मलाच एक सेकंद वाटलं कि मी खरच ओंकारेश्वरला
जाण्यासाठी आलो होतो. 
खांडवा स्टेशनला उतरलो आणि
म्हातारबाबाने सांगितलं “बेटा हमे अभी बससे ओंकारेश्वर जाना है”
मग जवळ-जवळ १.३० तासात
आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो होतो, बसमधून उतरताना माझ्यासोबतच उतरलेला म्हातारबाबा
“मै जल्दहि आता हूँ” असं म्हणत कुठे गायब झाला ते कळलच नाही.
पण आता सोबतीला हजारो लोक
होते, आणि तेही माझ्यासारखेच रस्ता चुकून आले असावेत असं वाटत होतं.मग मीहि एक अनुभव म्हणून
त्यांच्याबरोबर ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो आणि काय आश्चर्य, शिवलिंगाच्या
जागेवर कालचा म्हातारबाबाच ध्यान लावून बसला होता. आणि मग मी नर्मदामैय्याच्या
भेटीसाठी गेलो. 
तिथे गेल्यावर मनातली सगळी
खळबळ क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेली, मी इथे का आणि कसा आलोय हेही विसरून गेलो. 
 खरंतर घरी परतण्याची इच्छा नव्हतीच पण ४
दिवसांनी ‘तो’ म्हातारबाबा स्वप्नात आला, “बेटा, अब घर जाओ, माँजी-बाबूजी फ़िक्र कर
रहे है पर हमे भुलना नही”
मग परतलो तर काय आश्चर्य ! माझ्या घरी
बोर्डाकडून फोन आला होता कि माझी marksheet चुकली होती.               
जणू काही नर्मदामैय्याच मला
बोलावीत होती आणि मला घेऊन येण्यासाठीच त्या बाबाला तिने मुंबईला पाठवलं होतं, असं
वाटू लागलं. 
मग कधी भरकटलो नाही, भरकटलो
तरीही म्हातारबाबा स्वप्नात येतो आणि सांगतो “बेटा माँ बुला रही है” अणि मग मी परत तितक्याच ओढीने नर्मदा मैय्याकडे धाव घेतो.                                                                                        
मी ना धड आस्तिक-ना धड
नास्तिक होतो तेव्हा नर्मदामैय्याने माझ्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनाची हि कथा
!!
हि गोष्ट आहे ती मी बारावी झाल्यानंतरची, वयाचं १६वं वर्षं ओलांडून १७व्या वर्षात पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे अंगात तारुण्याचं सळसळतं वारं भरलं होतं. जगाच्या विरोधात जाऊन जग जिंकण्याची खुमखुमी चढली होती. मुळातच बाबांचं लग्न उशिरा झालं होतं आणि त्यातही लग्नानंतर गर्भार होण्यासाठी आईला अधिक कालावधी लागला होता, त्यामुळे बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये जनरेशन गॅपची भिंत उभी राहिलेली. आणि त्यात लागलेली संगत, परिणामी व्यसनांच्या आहारी गेलो होतो, त्यामुळे घरी रोजच भांडणं व्हायची. त्यात बारावीत आकर्षणाला प्रेम समजून वाहवत गेलो. या सार्याचा परिणाम बारावीच्या निकालात दिसलेला. आता करायचं काय ? घरी कसं जायचं ? बाप मारेल काय ? घरातून बाहेर काढेल काय ? नुसतं थैमान घातलं होतं विचारांनी. अनेकदा डोक्यात आत्महत्येचे विचारही येऊन गेले होते. रात्री ७ वाजेपर्यंत मी कॉलेजमध्येच बसून होतो.
त्यात एका मित्राने सुचवलं, “अरे एवढं कसलं टेन्शन घेतोस ? सरळ २-४ दिवस घरातून गायब हो, घरचे इमोशनली फुल बनतील आणि काहीही बोलणार नाहीत.”
घरी जायचं कुठे वगैरे विचार
करायला वेळच नव्हता. तसाच गेलो दादर स्टेशनला; अहमदाबादच्या मित्राकडे जायचं असं
ठरवून चढलो तो नेमका पंजाब मेल मध्ये a/c बोगीत. 
खरंतर तिकीट वगैरे काहीच नव्हतं.
तेवढ्यात एक धिप्पाड, जाडजूड, काळ्या वर्णाचा आजोबांच्या वयाचा माणूस माझाकडे आला आणि मला म्हणाला, “बेटा कहाँ जा रहे हो ?”
“अ...अं..” त्याला बघुनच एवढा घाबरलो होतो की
अहमदाबाद हे नावच तोंडून निघेना.
“अच्छा, तो तुमभी ओंकारेश्वर जा रहे हो, तो चलो
फिर साथ चलते हैं; तेरा सिट नंबर क्या है बेटा ?”
मी विचार केला की नाहीतरी फक्त घरापासून २-४ दिवस दूर राहण्यासाठी जायचय मग अहमदाबाद असो किंवा ओंकारेश्वर मला काय फरक पडतो ?
“अंकल मेरेपास तो टिकट ही नही है” इति मी ! 
“चलो कोई दिक्कत नहीं. यह तो अच्छा ही है,
क्यूंकि मेरे पास एक जादा है”
टीसी आला, त्या बाबाने तिकिट दाखवल, टीसी निघून
गेला.
रात्रि म्हातारबाबाने आणलेला कुसली नावाचा करंजीसारखा दिसणारा फार चविष्ट आणि गोड पदार्थ खाल्ला, जणू काही हा मला गोड
आवडतं म्हणूनच घेऊन आला होता.   ते खाऊन झोपलो ते म्हातारबाबाने
पहाटे ४.३० ला उठवलं, “बेटा, जाग जाओ, अभी खांडवा मे उतरना पडेगा. तभी तो
ओंकारेश्वर जा पाओगे”
या त्याच्या शेवटच्या
शब्दांत इतका विश्वास होता कि मलाच एक सेकंद वाटलं कि मी खरच ओंकारेश्वरला
जाण्यासाठी आलो होतो. 
खांडवा स्टेशनला उतरलो आणि
म्हातारबाबाने सांगितलं “बेटा हमे अभी बससे ओंकारेश्वर जाना है”
मग जवळ-जवळ १.३० तासात
आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो होतो, बसमधून उतरताना माझ्यासोबतच उतरलेला म्हातारबाबा
“मै जल्दहि आता हूँ” असं म्हणत कुठे गायब झाला ते कळलच नाही.
पण आता सोबतीला हजारो लोक
होते, आणि तेही माझ्यासारखेच रस्ता चुकून आले असावेत असं वाटत होतं.मग मीहि एक अनुभव म्हणून
त्यांच्याबरोबर ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो आणि काय आश्चर्य, शिवलिंगाच्या
जागेवर कालचा म्हातारबाबाच ध्यान लावून बसला होता. आणि मग मी नर्मदामैय्याच्या
भेटीसाठी गेलो. 
तिथे गेल्यावर मनातली सगळी खळबळ क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेली, मी इथे का आणि कसा आलोय हेही विसरून गेलो.
 खरंतर घरी परतण्याची इच्छा नव्हतीच पण ४
दिवसांनी ‘तो’ म्हातारबाबा स्वप्नात आला, “बेटा, अब घर जाओ, माँजी-बाबूजी फ़िक्र कर
रहे है पर हमे भुलना नही”
मग परतलो तर काय आश्चर्य ! माझ्या घरी बोर्डाकडून फोन आला होता कि माझी marksheet चुकली होती.
जणू काही नर्मदामैय्याच मला बोलावीत होती आणि मला घेऊन येण्यासाठीच त्या बाबाला तिने मुंबईला पाठवलं होतं, असं वाटू लागलं.
मग कधी भरकटलो नाही, भरकटलो तरीही म्हातारबाबा स्वप्नात येतो आणि सांगतो “बेटा माँ बुला रही है” अणि मग मी परत तितक्याच ओढीने नर्मदा मैय्याकडे धाव घेतो.
भातुकली
"मैथिली, प्लिज ऐकून घे.मला माहितीय, माझी सुनीलशी वाढती मैत्री नाही आवडत तुला. पण मी तरी काय करू ? सिक्युअर वाटतं गं त्याच्याबरोबर.तुझा बाबा कसा होता हे तुला समजलं तर तू मला नक्कीच समजून घेशील."
मनीषा, वेगळं झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या मुलीला मनातलं सांगत होती.
_________________________________________
" महेश, तुझा बाबा !" इतकं बोलून झाल्यावर मनीषाने उसासा टाकला आणि ती पुढे बोलू लागली.
" शिक्षण पूर्ण होईपर्यंत बाबा माझं लग्न महेशशी ठरवून मोकळे झाले होते.
गंमत म्हणजे मी महेशला अंतरपाट दूर होण्याआधी पाहिलं नव्हतं.
मी गोरीपान, सुंदर, कॉलेजक्वीन तर तो जाडा, ढेरपोट्या, काळा. थोडक्यात कुठल्याच बाबतीत आम्ही अनुरूप नव्हतो. त्याला हुंडा द्यायचा नव्हता एवढाच दिलासा होता.
पण त्याच्या संसाराच्या कल्पना जगावेगळ्या होत्या. रात्री अंथरुणापुरतं नवरा झालं कि नवऱ्याचं कर्तव्य संपायचं त्याचं.
दिवसभर अपमान, टोमणे, खोचक बोलणं
याबरोबरच कधीतरी तर रट्टेसुद्धा आणि दररात्री समाजमान्य बलात्कार करायचा तो
माझ्यावर. 
त्याच समाजमान्य बलात्कारातून तू
जन्माला आलीस, तेव्हा खरंतर त्याला मुलगा हवा होता.त्याने तुला मारायचा केलेला
प्रयत्न मी हाणून पाडला
आणि माझा त्रास दुप्पट वाढला.
त्याला एक वाक्य म्हणायची सवयच
लागली होती, "संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का ?"
बाबांना हे कळलं तर हार्ट अटॅक
येण्याची शक्यता असल्यामुळेच सारं सहन करत राहिले. पण ते झालंच, बाबा हे सहन
करू शकले नाहीत. 
बाबा गेल्यावर मात्र मला असह्य
होऊन मी ते माझ्यावर लादलं गेलेलं नातं संपवलं कारण महेशने काही पर्यायच ठेवला
नव्हता.
___________________________________________
मग जॉबला लागले, करस्पॉन्डन्सने मास्टर्स केलं, जोडीला तुझी जवाबदारी.  म्हणून आई आपल्याकडे राहायला आली.मग माझं प्रमोशन होऊन टर्मिनेशन
हाती आलं, मग पुण्याहून मुंबईला आलो.
मुंबईच्या ऑफिसमधल्या पहिल्या
दिवशीच मला सुनील भेटला. 
मला सर्वथा अनुरूप असा हा मुलगा
पण आता काय उपयोग होता ?
पण त्यापेक्षाहि सगळ्यात जास्त तो मला समजुन घ्यायचा. मला काही हवं-नको बघायचा.मला दरमहिना कसलीतरी गरज लागायची आणि मी त्याच्याकडे अगदी निःसंकोच मागायचे.मुख्य म्हणजे त्याची हि सारी मदत निरपेक्ष होती.
ह्यातूनच हळूहळू आमची मैत्री
वाढलीय, वाढतेय.
पण आज आम्ही कदाचित एका वेगळ्या
टप्प्यावर पोचलोय. 
मैत्री म्हणत म्हणत एकमेकांच्या
प्रेमात कधी पडलो ते आम्हालाही कळलं नाही.पण आज त्याने जाणीव करून दिलीय.
तो म्हणालाय, "तुझी आणि मैथिलीची, दोघांचीही तयारी असेल तर मग मला
तुमच्या
 
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
              
 
 
    
 
  शी खराखुरा
भातुकलीचा खेळ खेळायचाय. ज्या खेळात फक्त सुख-समाधानानं आपण हसत राहू आणि जो डाव
कधीच अर्ध्यावर मोडणार नाही.तुला काय वाटतं, काय उत्तर द्यावं ??"
खरंतर आपल्याला आजवर एखाद्या 'सुपरहिरो' सारखा भासणारा आपला बाबा असा असेल हा मैथिली साठी जबर धक्काच होता. पण त्या मिनिटभरानंतर धक्क्यातून सावरताना मैथिलीने एक निर्णय घेतला आणि ती आपल्या आईच्या दुसर्या लग्नाच्या तयारीला लागली.
मी असा घडलो
मुळात आमचे आई-बाबा पहिल्यापासूनच हौशी. त्यामुळे असे बरेच किस्से आहेत. त्यातले काही किस्से :
- किस्सा प्रकार :- गावातल्या नाटकाचे किस्से
 
मु.पो.चवे-देऊड हे ता.जि.रत्नागिरीतले,
गणपतीपुळ्यापासून १४किमीवर असणारे आमचे मूळ गाव. साधारण ३०० वर्षांपूर्वी आमच्या
पूर्वजांपैकी एकाला गावच्या नदीत अंघोळ करताना स्वयंभू गणेशमूर्ती सापडली, त्या
मूर्तीसाठी देऊळ बांधले. दर माघी गणेशजयंतीला उत्सव होतो. उत्सवप्रेमी कोकणी
माणसाचे दुसरे वेड म्हणजे उत्सवातील नाटक ! आमच्याकडेही २००५पर्यंत आम्ही(आई-वडील
आणि त्या पिढीतील देऊडकर) स्वतः नाटक बसवायचे त्या नाटकातले हे दोन प्रसंग..पहिला प्रसंग जेव्हा घडला तेव्हा अस्मादिक
४वर्षांचे होते. त्यावेळी अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’ नावाचे नाटक ठरले होते.
नाटकातल्या नायकाला एक वैशिष्ट्यपूर्ण पगडी पोशाखात दिली गेली होती. ती
अस्मादिकांनी रंगीत तालमीच्या वेळी पाहिली कारण आई-बाबा दोघेही नाटकात असल्याने
आम्हाला तालीम बघण्याचा अलिखित अधिकार होता. नाटकाची वेळ जवळ आली होती. भूमिका
असलेल्या माणसांच्या तोंडाची रंगरंगोटी चालू होती. अस्मादिकांना प्रेक्षकांमध्ये
बसलेल्या मामाकडे सोपविले होते. आणि मला काय वाटले काय ठावूक ? पण ‘पंपुशेठ’
नावाच्या नायकाची ‘ती’ पगडी घालून उघड्या रंगमंचावर फिरण्याचा हट्ट मी धरला. मी
कोणाचही ऐकेना म्हणून शेवटी अर्ध्या मेकअपवर बाबा विंगेतून पटकन माझ्याकडे आले आणि
मला घेऊन परत विंगेत गेले, तेही मला शांत करण्याच्या प्रयत्नात. पण मी त्यांचंही
ऐकेना म्हणून शेवटी पंपुशेठचं काम करणाऱ्या माणसाबरोबर नांदीपूर्वी पडदा उघडून मला
‘ती’ पगडी घालून एक फेरी मारायला दिली गेलीदुसरा किस्सा मी चौथीत असतानाचा. बाबाच
दिग्दर्शक. मला त्यावर्षीच्या नाटकात काम करायचे होते, पण ‘पद्मश्री धुंडिराज’
ह्या पुरुषपात्र-विरहीत   नाटकात
माझ्यासाठी एकही भूमिका नव्हती. मग शेवटी रागावून सगळ्यांशी अबोला धरला तेव्हा मूळ
संहितेत नसलेली भूमिका निर्माण करून बाबांनी मला नाटकात घेतले. पण नाटकाच्या वेळी
प्रेक्षकांमध्ये आपलीच माणसं बसलेली बघून कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी अर्जुन जसा
गलितगात्र झाला होता हे अनुभवले. मी खरंतर पळून समोर प्रेक्षकांमध्ये उडी घेणार
होतो, पण नाटकातल्या आईने म्हणजे मोठ्या काकूने हात घट्ट धरून ठेवला आणि माझी सगळी
वाक्य कापून फक्त माझी उपस्थिती ठेवून नाटक यशस्वीपणे पार पाडले गेले.
  किस्सा प्रकार दुसरा : शाळेतल्या
स्नेहासंमेलातले किस्से 
ह्यात अगदी नाटक लिहिण्यापासून सारी मदत
आई-बाबांनी केलेली आहे. कधी जुन्या एक्सरेपासून मुकुट कर, तर कधी त्यावर कापूस
लावून दाढी-मिश्या तयार कर; कधी इलेक्ट्रिक केसिंगपट्टी पासून तलवार कर, तर कधी
मोरपिसे आणून मला मोर कर असे अनेक प्रकार, अनेक वेशभूषा कधी घरातील टाकाऊ पासून
तयार करून तर कधी लोकांकडून मागून आणून मला स्नेहसंमेलनासाठी तयार करणे हि मुख्य
जवाबदारी आई-बाबानी शाळेची १०वर्षे पार पाडली. सहावीत असताना सरांनी मला “नाटक
लिहिणार का ?” विचारलं, खरंतर ह्याआधी असं काहीच केलं नसताना मी ‘हो’ म्हटलं.
खरंतर धड्याचेच नाट्यरूपांतरण करायचे होते; पण मला जमेना. तेव्हा आईने स्वतः लिहून
दिले आणि शाबासकी मला मिळाली.ज्यावेळी इतर सार्याच सहभागी विद्यार्थ्यांचे
पालक प्रेक्षकांमध्ये बसलेले असायचे तेव्हा अनेकदा माझे आई/बाबा वरती माझी आणि इतर
मुलांची तयारी करून देत असायचे. हीच गोष्ट शाळेतल्या फँन्सी ड्रेस, वारी अशा अनेक
वेळी झाली. आई-बाबा होते म्हणून अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवली, आई-बाबा होते म्हणून
अनेक ठिकाणचे अपयश पचवू शकलो.
- किस्सा प्रकार तिसरा : ‘मनाचे श्लोक’ पाठांतर
स्पर्धा
 
तिसरीत इतरांपेक्षा कमी पाठ झाले म्हणून
वगळण्यात आल्यानंतर आईने ४थीला माझ्यावर जीवापाड मेहनत घेतली आणि इतरांपेक्षा अचूक
म्हणू लागलो. पण इतरांपेक्षा अचूक म्हणतो आणि टीमचे कोऑडिनेशन होत नाही म्हणून
वगळण्यात आले. तेव्हा त्यासाठी आईने शाळेत जाऊन राडा घातला होता, त्यावेळची ‘ती’
रणचंडिका माता काही झाले तरीही विसरू शकत नाही.
- किस्सा प्रकार चौथा : कॉलेजमधला पहिल्या आयएनटी
चा किस्सा (पुणेकरांसाठी : आय.एन.टी. हि पुरुषोत्तम प्रमाणेच एक दिग्गज एकांकिका
स्पर्धा असते)
 
माझी आय.एन.टी. ची पहिलीच वेळ. जत्रेचा सीन
होता. फुगेवाल्याची भूमिका मला दिली गेली होती. मध्ये ‘स्टॅच्यु पोजिशन’ आणि ‘स्लो
मोशन’ होते. मी ‘स्टॅच्यु पोजिशन’मध्ये न थांबता स्लो मोशन मध्ये लाईटलाईनच्या
म्हणजे जिथे रंगमंचावरचा लाईट पडत नाही त्या भागात जाऊन पुन्हा तसच फिरून झिरो
विंगेतून आत न जाता सेकंड लेफ्ट विंगेतून आत गेलो.
- असे अनेक किस्से, अनेकांचे हातभार, अनेकांचे
सांभाळून घेणे, अनेकांनी ‘शाळा’ घेणे ह्यामुळे रंगमंचावर सरावलो आहे, आणि कधीच न
जाणारे नाट्यवेड घेऊन प्रवास करत आहे.                  
 
                                                                                
बुधवार, २२ जून, २०१६
आस्तिकता & नास्तिकता : महाचर्चा (भाग १)
"एक ओर से ये दुनिया को देख लो ये जरुरी नही"
कुठल्याही वादविवाद स्पर्धेत प्रतीवादाला सुरुवात करताना शोभेल असं 'हे' वाक्य ! कारण मुळात स्पर्धक इतरवेळी कुठल्याही बाजूने किंवा सारासार विचार करत असला तरीही 'त्या' कालावधीमध्ये त्याला एकच बाजू पटवायची असते, स्वतःला कितीही पटत नसले तरीही !पण फेसबुक सारख्या माध्यमात अशा एखाद्या स्पर्धकमित्राने, त्यातहि तुझ्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या माणसाने सारासार न करता एखादं मत मांडणं आणि त्यावर मला हे वाक्य वापरावं लागणं हे माझ्यासाठी खरंतर अनपेक्षित आहे.
विषयावर येण्यापूर्वी एक सांगतो, 'मूळ आणि सर्वार्थाने योग्य' हि संकल्पनाच मुळात व्यक्तीसापेक्ष आहे.
माझी बाजू मांडण्यापूर्वीच हे सांगतो कि मी आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या, दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या बाजूंच्या वेगवेगळ्या पातळ्यांमधून गेलो आहे. मुळात जन्म टिपिकल ब्राह्मण घरातला, त्यामुळे पूजा वगैरे ह्या सगळ्यावर ४थिपर्यंत प्रचंड विश्वास. त्यानंतर साधारण ५विपासून वाचनाला केलेली सुरुवात आणि त्यातून येत गेलेली समज, यांमुळे आस्तिकता-नास्तिकता यांच्यातलं मनात चाललेलं द्वंद्व, त्यानंतर एका वेगळ्या पातळीवर विचार केल्यानंतर आलेली नास्तिकता आणि त्यातून पुन्हा रंगलेलं द्वंद्व, आणि त्यानंतर संपूर्ण विचारांती भरकटलेल्या, स्वतंत्र विचार न करू शकणार्या भाबड्या माणसांना देवाची असलेली गरज मान्य करणं आणि त्याच बरोबर एका अनोख्या, अद्भुत, अनाकलनीय आणि तरीही अज्ञात चैतन्याचं अस्तित्व मान्य करणं (ह्यालाच 'भक्त' देव/गॉड/जीजस/अल्लाह वगैरे म्हणतात बरं). असा हा सारा प्रवास ! ह्या प्रवासात अनेक जण भेटले देवाच्या, स्वतःच्या शोधात असलेले; स्वतःला देवाला किंवा स्वत्वाला वाहून घेतलेले.ते सारेच आज आठवले, तुझ्या ह्या पोस्ट ने !आणि म्हणूनच त्या सार्यांच्या साक्षीने उत्तर देतोय.
मुळात टोकाची आस्तिकता आणि टोकाची नास्तिकता दोन्हीही मानसिक विनाशाला आणि मानसिक दुबळेपणाचे द्योतक आहेत. फक्त भाबडा देवभक्त आस्तिक हे मान्य करतो कि तो दुबळा आहे आणि नास्तिक आस्तिकांना भाबडं, वेडं वगैरे सिद्ध करण्यात आपली वैचरिक क्षमता सिद्ध करतोय वगैरे अशा भाबड्या समजुतीत हे सिद्ध करून जातो.
जे भाबडेपणाने आस्तिक होतात आणि इतरांचे अनुकरण करत एखाद्या देवाला मानतात, पूजतात ते देवाबाबतच्या प्रश्नांना टाळण्याचा आटोकाट प्रयत्न असतो. पण मुळात जे खरंच ज्ञानी आस्तिक आहेत ते उलट अशा वादविवादांची वाट बघत असतात. तसंच ते नास्तिकांना बावळट न ठरवता केवळ मार्ग चुकलेले म्हणतात आणि त्यांच्यापैकी काही तर नास्तिकतेचा मार्ग वेगळा असूनही त्यांचा आदर करतात.
आता उर्वरित कर्मठ आस्तिकांनी नास्तिकांना बावळट म्हटलेलं असताना नास्तिकांनी त्यांच्याकडे किती लक्ष द्यावं हा प्रश्नच आहे. पण एक सांगतो, मी बघितलेले असे कर्मठ आस्तिक कधीही स्वतःहून नास्तिकांच्या नास्तिकतेवर बोट ठेवत नाहीत, उलट नास्तिक मात्र आस्तिकांच्या आस्तिकतेवर बोट ठेवण्याची संधीच शोधत असतात.
मुहम्मद सफदर अल् अफगाणी याचा मुद्दा उपस्थित करत असताना तुला असे नास्तिक दिसत नाहीत का जे देवाचं अस्तित्व तर नाकारतात, पण एखाद्या महान व्यक्तिमत्वावर श्रद्धा ठेवतात. आता हि व्यक्तीपूजा म्हणजे त्या व्यक्तीला देवत्व बहाल करणं नव्हे का ? पर्यायाने आस्तिकता नव्हे का ?
मी असे आस्तिक बरेच पाहिलेत, ज्यांच्या श्रद्धा, निष्ठा ह्या त्यांच्यापुरत्या मर्यादित असतात. पण असे नास्तिकहि बरेच पाहिलेत जे इतरांच्या निष्ठा, श्रद्धा कशा खुळचट आहेत, हे त्यांना पटवून देऊन स्वतःच्या मार्गावर आणण्याच्या अट्टाहास करत असतो. आता हा स्वतःचे महत्त्व पटविण्यासाठी इतरांच्या श्रद्धा, निष्ठा वापरण्याचा प्रकार नव्हे का ?
राहिला प्रश्न महाभारतातील, कुराणातील, बायबल आणि तत्सम इतर धर्मग्रंथातील मधील पात्रांचा, त्यांच्या अचाट, अमानवी ताकदींचा, शक्तीचा, सामर्थ्याचा !
मला एक सांग, हॉलीवूडमधले 'ऍव्हेन्जर्स' किंवा तत्सम काय ? बॉलीवूडमधल्या किंवा दाक्षिणात्य चित्रपटातल्या कुठल्याही अॅक्शनपटातले 'हिरो' काय ? हे सारे प्रेक्षकांना का आवडतात; कारण त्यांची अचाट, अमानवी ताकद/शक्ती/समर्र्थ्य !मग देवाचं अस्तित्व पटविण्यासाठी थोड्याशा अचाट, अमानवी कल्पनांना मूर्त रूप दिले तर बिघडले कुठे ?
तुला, मला त्या नाही पटत ना ? मग देऊया कि सोडून ! मुळात रामायणातला अचाट अमानवी 'हनुमान' आणि अग्निदिव्य वगैरे भाग वगळला तर रामायण हे आदर्श ठरत नाही का ?
मुळात एक सांगतो, ह्या जगत अशी कोट्यावधींची लोकसंख्या आहे, जे तुझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत नाहीत, सारासार विचार करू शकत नाहीत; अशा लोकांसाठी, अशा लोकांमुळे देव हि संकल्पना रूढ झाली. दुर्दैवाने ह्या २१विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही शांत आणि श्रांत समाजजीवनासाठी भाबड्या, अज्ञानी लोकांना देवाची मानसिक गरज आहे, आपल्याला नसली तरीही.
तेव्हा उगाच इतर सामान्य नास्तीकांप्रमाणे न वागता पुन्हा एकदा सारासार विचार कर आणि मग बघ, नक्कीच तुझ्या मतात फरक पडेल.
सर्वात शेवटी हे सांगतो कि; आस्तिकता काय किंवा नास्तिकता काय, दोन्ही गोष्टी म्हणजे मिरवायचे दागिने नव्हेत तर स्वतःची वैयक्तिक मते आहेत. तेव्हा स्वतःला 'माणूस' म्हणत असाल तर ह्या गोष्टी स्वतःपाशीच ठेवून माणुसकीने वागा; जगा आणि जगू द्या.
© - सर्वेश्वर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)