"मैथिली, प्लिज ऐकून घे.मला माहितीय, माझी सुनीलशी
वाढती मैत्री नाही आवडत तुला. पण मी तरी काय करू ? सिक्युअर वाटतं
गं त्याच्याबरोबर.तुझा बाबा कसा होता हे तुला समजलं
तर तू मला नक्कीच समजून घेशील."
मनीषा, वेगळं झाल्यावर
पहिल्यांदाच आपल्या मुलीला मनातलं सांगत होती.
_________________________________________
" महेश, तुझा बाबा !" इतकं बोलून झाल्यावर मनीषाने उसासा टाकला आणि ती पुढे बोलू लागली.
" शिक्षण पूर्ण होईपर्यंत बाबा माझं
लग्न महेशशी ठरवून मोकळे झाले होते.
गंमत म्हणजे मी महेशला अंतरपाट
दूर होण्याआधी पाहिलं नव्हतं.
मी गोरीपान, सुंदर, कॉलेजक्वीन तर
तो जाडा, ढेरपोट्या, काळा. थोडक्यात कुठल्याच बाबतीत आम्ही अनुरूप नव्हतो. त्याला हुंडा
द्यायचा नव्हता एवढाच दिलासा होता. 
पण त्याच्या संसाराच्या कल्पना
जगावेगळ्या होत्या. रात्री अंथरुणापुरतं नवरा झालं कि नवऱ्याचं कर्तव्य संपायचं
त्याचं.
दिवसभर अपमान, टोमणे, खोचक बोलणं
याबरोबरच कधीतरी तर रट्टेसुद्धा आणि दररात्री समाजमान्य बलात्कार करायचा तो
माझ्यावर. 
त्याच समाजमान्य बलात्कारातून तू
जन्माला आलीस, तेव्हा खरंतर त्याला मुलगा हवा होता.त्याने तुला मारायचा केलेला
प्रयत्न मी हाणून पाडला
आणि माझा त्रास दुप्पट वाढला.
त्याला एक वाक्य म्हणायची सवयच
लागली होती, "संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का ?"
बाबांना हे कळलं तर हार्ट अटॅक
येण्याची शक्यता असल्यामुळेच सारं सहन करत राहिले. पण ते झालंच, बाबा हे सहन
करू शकले नाहीत. 
बाबा गेल्यावर मात्र मला असह्य
होऊन मी ते माझ्यावर लादलं गेलेलं नातं संपवलं कारण महेशने काही पर्यायच ठेवला
नव्हता.
___________________________________________
मग जॉबला लागले, करस्पॉन्डन्सने मास्टर्स केलं, जोडीला तुझी जवाबदारी.  म्हणून आई आपल्याकडे राहायला आली.मग माझं प्रमोशन होऊन टर्मिनेशन
हाती आलं, मग पुण्याहून मुंबईला आलो.
मुंबईच्या ऑफिसमधल्या पहिल्या
दिवशीच मला सुनील भेटला. 
मला सर्वथा अनुरूप असा हा मुलगा
पण आता काय उपयोग होता ?
पण त्यापेक्षाहि सगळ्यात जास्त तो
मला समजुन घ्यायचा. मला काही हवं-नको बघायचा.मला दरमहिना कसलीतरी गरज लागायची
आणि मी त्याच्याकडे अगदी निःसंकोच मागायचे.मुख्य म्हणजे त्याची हि सारी मदत
निरपेक्ष होती.
ह्यातूनच हळूहळू आमची मैत्री
वाढलीय, वाढतेय.
पण आज आम्ही कदाचित एका वेगळ्या
टप्प्यावर पोचलोय. 
मैत्री म्हणत म्हणत एकमेकांच्या
प्रेमात कधी पडलो ते आम्हालाही कळलं नाही.पण आज त्याने जाणीव करून दिलीय.
तो म्हणालाय, "तुझी आणि मैथिलीची, दोघांचीही तयारी असेल तर मग मला
तुमच्या
 
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 
 
 
 
शी खराखुरा
भातुकलीचा खेळ खेळायचाय. ज्या खेळात फक्त सुख-समाधानानं आपण हसत राहू आणि जो डाव
कधीच अर्ध्यावर मोडणार नाही.तुला काय वाटतं, काय उत्तर द्यावं ??"
खरंतर आपल्याला आजवर एखाद्या 'सुपरहिरो' सारखा भासणारा आपला बाबा असा असेल हा मैथिली साठी जबर धक्काच होता. पण त्या मिनिटभरानंतर  धक्क्यातून सावरताना मैथिलीने एक निर्णय घेतला आणि ती आपल्या आईच्या दुसर्या लग्नाच्या तयारीला लागली.      
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा